🖥️ _*मायक्रोसाॅफ्टकडून 'विंडोज-11' लाॅंच, नवे फीचर्स मिळणार, असे करा डाऊनलोड
💻 मायक्रोसाॅफ्ट या जगप्रसिद्ध आयटी कंपनीने त्यांची नवीन 'विंडोज-11' (Windows 11) ही 'ऑपरेटिंग सिस्टम' नुकतीच लाॅंच केली. या नवीन 'ऑपरेटिंग सिस्टम'वर युजर्स अधिक वेगाने काम करू शकतील, असा दावा मायक्रोसॉफ्टने केला आहे.
👩🏻💻 जगभरातील लॅपटॉप, डेस्कटॉपवर ही नवी 'ऑपरेटिंग सिस्टम' डाउनलोड करता येणार आहे. 'विंडोज-11'मध्ये नवीन फीचर्स आणि बदलांसह कंपनीने 'ऑफिस- 2021' देखील लाँच केलेय. चला तर मग 'विंडोज-11' कशी डाऊनलोड करायची, त्यात कोणते फीचर्स मिळतील, याबाबत जाणून घेऊ या..
📩 *विंडोज-11 कसे डाऊनलोड करणार..?*
▪️ सर्वप्रथम लॅपटॉप, कंप्यूटर या अपडेटसाठी पात्र आहे का, ते पाहा.
▪️ मायक्रोसाॅफ्टचे अधिकृत 'पीसी हेल्थ चेक' अॅप डाउनलोड करा.
▪️ नंतर Windows Key + I एकाच वेळी प्रेस करून सेटिंगमध्ये जा. तेथे Update & Security वर क्लिक करा.
▪️ डावीकडे Windows -11 अपडेट चेक करा. Check for Updates वर क्लिक करा.
▪️ तुमचा पीसी पात्र असल्यास upgrade to Windows 11 is ready असा मेसेज दिसेल.
▪️ आता Download and install वर क्लिक करा. नंतर डाउनलोड सुरु होईल.
▪️ डाउनलोड आणि इन्स्टॉल झाल्यावर तुमचा पीसी 'विंडोज- 11'वर रिबूट होईल.
✅ *'विंडोज- 11'मधील नवे फीचर्स*
नव्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये युजर इंटफेस बदलला आहे. त्यात नवीन स्टार्ट मेनू, सेंटर टास्कबार आणि मायक्रोसॉफ्ट स्टोअर मिळेल. कॅलेंडर, पेंट, वेदर आणि स्पोर्ट्स लीडरबोर्डमध्येही बदल केलेत. सुधारित सिस्टम ट्रे, नोटिफिकेशन आणि क्विक अॅक्शन UI दिलेला आहे.
Thank You And Visit Agin.


إرسال تعليق