शेतकरीच करणार आता पिकांचा पंचनामा, राज्य सरकारचे नवं धोरण..!

 शेतकरीच करणार आता पिकांचा पंचनामा, राज्य सरकारचे नवं धोरण..!

https://rudranshenterprises.blogspot.com/2021/11/blog-post.html


राज्य सरकारने ऑगस्टमध्ये ‘ई- पीक पाहणी’ अ‍ॅप आणले होते. त्या माध्यमातून शेतकऱ्यांनीच स्वत:च आपल्या पिकांची नोंद केली होती. त्यानंतर आता आपल्या नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामाही शेतकऱ्यांनाच करता येणार आहे. तसा पर्याय राज्य सरकार उपलब्ध करुन देणार आहे.


⛈️ नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचा वेळेत पंचनामा न झाल्यास भरपाई मिळत नाही. त्यामुळे ‘ई- पीक पाहणी’ अ‍ॅपच्या धर्तीवर राज्य सरकार ‘ई-पंचनामा’ हा उपक्रम राबविणार आहे.



📝 असे करता येणार पंचनामे :- 

‘ई-पंचनामा’ प्रणालीसाठी महसूल विभाग स्वतंत्र अ‍ॅप तयार करणार आहे. नुकसानग्रस्त पिकांचे फोटो काढून गट क्रमांक व अक्षांश-रेखांशच्या नोंदी शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलमधून ऑनलाइन सादर करता येईल. शेतकऱ्यांनी दिलेली माहिती तपासून पाहण्याचे काम तलाठ्यांना करावे लागणर आहे.


💰 लवकर मिळणार नुकसान भरपाई :- 

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे काम शेतकरी करणार असल्याने तलाठी, तसेच कृषी सहायक व ग्रामसेवकांचा भार हलका झाला आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यास तलाठ्यांनी मान्यता दिली की थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात भरपाई मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
















Post a Comment

Previous Post Next Post