💰 इन्कम टॅक्स फाईल 💰

💰 इन्कम टॅक्स फाईल 💰

महत्वाची माहिती




प्रश्न: इन्कम टॅक्स रिटर्न फाईल म्हणजे काय ?

 उत्तर: एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षाच्या कालावधीतील उत्पन्नाचे आणि आर्थिक व्यवहाराचे तपशील इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सादर करणे म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे होय.


प्रश्न: इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे मला बंधनकारक आहे का ?

उत्तर: आपले वार्षिक करपात्र उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त असल्यास इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे आपल्याला बंधनकारक आहे. तसेच आयकर विभागाने नेमून दिलेले काही आर्थिक व्यवहार झालेले असल्यास आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करावे लागते.     


प्रश्न: समजा माझे उत्पन्न २.५० लाखापेक्षा कमी असेल तरी मी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकतो का ?

उत्तर: आपले इन्कम कितीही असले किंवा नसले तरीही आपण स्वतःहून इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकता.    


प्रश्न: इन्कम टॅक्स रिटर्नचे फायदे काय आहेत ?  

उत्तर: बँकेचे कर्ज घेताना बँकेत जाण्याआधी आपल्याकडे २ ते ३ वर्षांची इन्कम टॅक्स रिटर्न फाईल असणे आवश्यक आहे. त्याशिवाय सरकारी आणि खाजगी कामांसाठी आणि आर्थिक व्यवहारांसाठी हा एक उत्पन्नाचा दाखला मानला जातो. बऱ्याच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न असणे गरजेचे असते.    


प्रश्न: मी जर इन्कम टॅक्स फाईल बनवली तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट माझ्या मागे तर लागणार नाही ना?  

उत्तर: हा विचार खूप जुना झाला आहे. आजच्या डिजिटल काळात आपल्या आर्थिक व्यवहारांची माहिती डिपार्टमेंटला आधीच असते. उलट आपण जाणून बुजून आपले उत्पन्न लपवून इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे टाळले तर भविष्यात डिपार्टमेंट कडून आपल्याला नोटीस येऊन आर्थिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना आणि त्या नंतरही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मित्रासारखी मदत करते. म्हणून एक सुजाण नागरिक या नात्याने आपल्या आणि देशाच्या हितासाठी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे कायदेशीर आणि फायदेशीर आहे.      


प्रश्न: इन्कम टॅक्स रिटर्न फाईल कधी करावा लागतो ?

उत्तर: दरवर्षी मार्च ला संपणाऱ्या आर्थिक वर्षाचा ITR जुलै-ऑगस्ट पर्यंत फाईल करावा लागतो.    


प्रश्न: ITR फाईल करण्यासाठी काय कागदपत्रे लागतात ?  

उत्तर: आपले पॅन कार्ड, आधार कार्ड, सर्व बँकांचे स्टेटमेंट्स, लोन स्टेटमेंट्स, खरेदी विक्रीची कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची इतर कागदपत्रे लागतात.    


प्रश्न: इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी वेळ आणि खर्च किती लागतो ?  

उत्तर: सॅलरी इन्कमसाठी १ दिवस तर, आपला व्यवसाय असल्यास साधारणपणे ३-४ दिवस लागू शकतात. तसेच आपल्या उत्पनाच्या प्रकारावर आणि आपल्या आर्थिक उलाढालीवर अवलंबून खर्चही कमी असतो. (सॅलरी ITR ५०० रुपयांपासून तर बिझनेस ITR २,००० रुपयांपासून पुढे सुरु होतो)   


प्रश्न: तुम्ही सांगत असलेला खर्च जरा जास्त वाटतोय ?

उत्तर: दोन पैसे वाचविण्यासाठी कुठल्या तरी अज्ञानी व्यक्तीकडून फाईल बनवून घेऊन नंतर पश्चाताप होण्यापेक्षा दोन पैसे जास्त देऊन आमच्या तज्ज्ञांकडून ITR फाईल करून घेणे कधीही फायदेशीर आहे. शिवाय इन्कम टॅक्स फाईल ही वर्षातून एकदाच बनवायची असते आणि खूप महत्वाची असते, म्हणून ती अचूक बनायला पाहिजे. 


प्रश्न: मी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल कुठे आणि कसा करू ?

उत्तर: स्वतः इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी आपल्याला इन्कम टॅक्स ऍक्ट चा खूप अभ्यास असणे गरजेचे आहे. अचूक ITR फाईल करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि मदत महत्वाची असते. त्यासाठी आम्हाला आमच्या नंबरवर कधीही संपर्क करा.  


प्रश्न: मला इन्कम टॅक्स रिटर्न बद्दल अजून प्रश्न आहेत ?

उत्तर: आपण आम्हाला कधीही संपर्क करू शकता. आम्ही आपल्याला शक्य ती सगळी माहिती देऊन मार्गदर्शन करू.

 

धन्यवाद!

______

ही माहिती आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करून त्यांनाही आर्थिक साक्षर करा.  


अधिक माहितीसाठी आणि आपली इन्कम टॅक्स फाईल बनविण्यासाठी आजच आम्हाला संपर्क करा.


 संपर्क: 

Rudransh Enterprises.

(Barshi, Solapur)

📱9763626287 

Post a Comment

أحدث أقدم