नवी दिल्ली – किसान सन्मान योजनेचा हप्ता कधी मिळणार ही चर्चा गावागावातील पारावार रंगली आहे. देशभरातील अनेक शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 10व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी 16 डिसेंबर रोजी पीएम किसानचा 10वा हप्ता रिलीज करण्याचा अंदाज आहे.
या अंदाजा मागे कारण असे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 डिसेंबरला गुजरात सरकार आयोजित नैसगीक शेती पद्धती ऑनलाइन कृषि कार्यक्रमाचा समारोप करणार आहेत. या कार्यक्रमाला 500 हजार शेतकरी उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे की कार्यक्रमाच्या वेळेस मोदी दहाव्या हपत्याची घोषणा करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या या मोठ्या कार्यक्रमात संबोधित करणार असल्यामुळे पीएम किसानचा 10 वा हप्ता गुरुवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची जोरदार चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. मात्र या वृत्ताला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही आणि हा केवळ अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी 25 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी पीएम-किसानचा 7 वा हप्ता जारी केला होता. PM मोदींनी 25 डिसेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 9 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबांना 18,000 कोटी रुपये हस्तांतरित केले होते. या दिवशी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती देखील असते.
गेल्या वर्षी 25 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले होते. तब्बल 18 हजार कोटी रुपये 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना देण्यात आले होते. 31 मार्च 2021 पर्यत या हपत्याअंतर्गत 10,23,49,443 रुपये खात्यात जमा करण्यात आले होते.
दरम्यान पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2000 हजार रुपये वर्षातून तीन वेळा जमा केले जातात. आतापर्यत तब्बल 9 हप्ते सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे. तसेच 12 कोटीहून अधिक नागरिक नोंदणीसाठी उत्सुक आहेत. आता किसान सन्मान योजनेत अनेक नियम बदलण्यात आले आहेत. त्यसाठी केवायसी देखील अनिवार्य आहे.
पीएम किसान योजना लाँच करण्यात आली तेव्हा सुरुवातीला त्याचे फायदे फक्त 2 हेक्टरपर्यंतची एकत्रित जमीन असलेल्या लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबांनाच मिळू शकत होते. या योजनेत नंतर जून 2019 मध्ये सुधारणा करण्यात आली आणि सर्व शेतकरी कुटुंबांना त्यांचा धारण आकार विचारात न घेता विस्तारित करण्यात आली.
إرسال تعليق