कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मिळाली मुदत वाढ तारीख जाहीर | जाणून घ्या सविस्तर माहिती...
नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय वैयक्तिक लाभांच्या योजने अंतर्गत ज्या व्यक्तींनी दुधाळ गाई/म्हैस ,शेळी,मेंढि,कुक्कुट पालन तसेच १००० मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीसाठी ऑनलाईन पद्धतीने सन २०२१-२२ साठी अर्ज केला होता अश्या व्यक्तींची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
आपली निवड झाली का कसे चेक करणार?
- प्रथम तुम्हाला https://ah.mahabms.com/ हि वेबसाईट ओपन करायची आहे.
- आपण AH-MAHABMS या Application चा वापर करून सुद्धा निवड झाली का हे पाहू शकता.
- वेबसाईट होम पेज वरती आल्या नंतर उजव्या बाजूला कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावरती क्लिक करा.
- आपल्या समोर पेज पाहायला मिळेल. येथे अर्जदाराचे आधारकार्ड आणि पासवर्ड टाकून लॉग-इन करावे लागेल.
- आपल्याकडे पासवर्ड नसेल तर आपण पासवर्ड विसरलात या पर्यायावरती क्लिक करावे लागेल.नंतर समोरील चौकोनात अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून जतन करा या बटन वरती क्लिक करा.
- आपल दिलेल्या मोबाईल नंबर वरती एस एम एस द्वारे पासवर्ड पाठविला जाईल.हा पासवर्ड वापरून आपण लॉग-इन करू शकता.
- लॉग-इन केल्या नंतर आपल्या समोर आपण केलेल्या अर्जाची माहिती पाहायला मिळेल.आपली निवड झाली असेल तर अर्ज समोर निवडा हा पर्याय पाहायला मिळेल.अशा प्रकारे आपण आपली निवड झाली का हे पाहू शकता.
आपली या योजने अंतर्गत निवड झाली असेल तर आपणांस विहित कालावधीत कागपत्रे ऑनलाईन संकेतस्थळावर अपलोड करावी लागतील.
नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय वैयक्तिक लाभांच्या लाभार्थ्यांची योजने अंतर्गत निवड करण्यात आली आहे.अशा लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी दिनांक. १२/०१/२०२२ (सकाळी १०:००) पासून ते दिनांक १६/०१/२०२२ (रात्री १२:००) पर्यंत अपलोड करण्याची मुदत देण्यात आली होती.
परंतु लाभार्थ्यांनी ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने निवड झालेल्या व प्रतीक्षाधीन लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत वाढवून दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी रात्री १२:०० वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
إرسال تعليق